Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rajya Sabha Election: खर्गे, देवेगौडांसह दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपणार; देशातील २४ राज्यसभा जागांसाठी रणधुमाळी, महाराष्ट्रातही पोटनिवडणूक

Rajya Sabha Election: खर्गे, देवेगौडांसह दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपणार; देशातील २४ राज्यसभा जागांसाठी रणधुमाळी, महाराष्ट्रातही पोटनिवडणूक

Rajya Sabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील राजकीय घडामोडींना वेग देणारी मोठी घोषणा केली आहे. आगामी जून आणि जुलै २०२६ मध्ये मुदत संपत असलेल्या १० राज्यांतील राज्यसभेच्या २४ जागांसाठी तसेच अन्य २ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका रिक्त जागेचाही समावेश असून, संपूर्ण देशाचे लक्ष या हायव्होल्टेज निवडणुकीकडे लागले आहे.

महाराष्ट्रात पोटनिवडणूक का?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातील एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक होणार असून, येथे निवडून येणाऱ्या नव्या खासदाराला ४ जुलै २०२८ पर्यंतचा कार्यकाळ मिळणार आहे. महाराष्ट्रासोबतच तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकचे नेते सी. षण्मुगनम यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या दुसऱ्या जागेवरही पोटनिवडणूक घेतली जाईल.

या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत देशातील अनेक दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय चुरस पाहायला मिळेल. मुदत संपणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये:

  • मल्लिकार्जुन खर्गे (काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष)
  • एच. डी. देवेगौडा (माजी पंतप्रधान)
  • दिग्विजय सिंह (मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री)
  • रवनीत सिंह बिट्टू (केंद्रीय मंत्री)
  • राजेंद्र गेहलोत व नीरज डांगी (राजस्थान)

कोणत्या राज्यात किती जागा?
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, एकूण १० राज्यांमध्ये या २४ जागा विखुरलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांतून सर्वाधिक प्रत्येकी ४ जागा रिक्त होत आहेत.

इतर राज्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

मध्य प्रदेश आणि राजस्थान: प्रत्येकी ३ जागा

झारखंड: २ जागा

मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम: प्रत्येकी १ जागा

असा असेल संपूर्ण निवडणूक कार्यक्रम (जून २०२६)
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना १ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ८ जून २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी ९ जून २०२६ रोजी केली जाईल, तर उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी ११ जून २०२६ पर्यंतचा वेळ असेल. यानंतर, अत्यंत महत्त्वाचा असलेला मतदानाचा टप्पा १८ जून २०२६ रोजी पार पडेल, ज्यासाठी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे १८ जून रोजी संध्याकाळी ५:०० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल घोषित केले जातील. शेवटी, २० जून २०२६ पर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण केली जाईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!