Today शुक्रवार, 6th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Tiger Attack : वाघाचा थरारक हल्ला! तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांचा जागीच मृत्यू

Tiger Attack : वाघाचा थरारक हल्ला! तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या चार महिलांचा जागीच मृत्यू

Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यातील सिदेंवाही तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू केला. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास काही महिला जंगलात तेंदू पाने गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या एकाच परिसरात काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून गावकऱ्यांना जंगल परिसरात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मृत महिलांची नावे

कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय 45)
अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय 46)
संगीता संतोष चौधरी (वय 36)
सुनीता कौशिक मोहुर्ले (वय 33)

या घटनेमुळे मोहुर्ले आणि चौधरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून वनविभागाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात यापूर्वीही वाघाचा वावर दिसून आला होता. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याने ही घटना जिल्ह्यातील सर्वात गंभीर वन्यप्राणी हल्ल्यांपैकी एक मानली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!