Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMPML Bus Routes Changed: पुणेकरांनो लक्ष द्या! कात्रज मेट्रोच्या कामामुळे पीएमपीचे अनेक थांबे बदलले; ‘या’ मार्गांवरील प्रवाशांची होणार धावपळ

PMPML Bus Routes Changed: पुणेकरांनो लक्ष द्या! कात्रज मेट्रोच्या कामामुळे पीएमपीचे अनेक थांबे बदलले; ‘या’ मार्गांवरील प्रवाशांची होणार धावपळ

PMPML Bus Routes Changed: पुण्यात मेट्रो नेटवर्कचा विस्तार वेगाने होत असतानाच, दुसरीकडे मात्र याचा थेट फटका सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या नागरिकांना बसू लागला आहे. स्वारगेट ते कात्रज या ‘पर्पल लाईन’वरील भुयारी मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाल्याने, कात्रज परिसरातील ‘PMPML’चे अनेक महत्त्वाचे बस थांबे तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले आहेत. २० मे पासून लागू झालेली ही नवी व्यवस्था पुढील आदेश येईपर्यंत अशीच कायम राहणार असल्याने प्रवाशांना आता नव्या थांब्यांवरून बस पकडावी लागणार आहे.

कात्रज चौकात बदललेली नवी बस व्यवस्था:
मेट्रोच्या बांधकामात कोणताही अडथळा येऊ नये आणि प्रवाशांची सुरक्षा राखली जावी, म्हणून कात्रज पोलीस चौकीजवळील मुख्य थांबा बदलण्यात आला आहे. सुधारित मार्ग खालीलप्रमाणे आहेत:

  • कात्रज बायपास पुलाखालील थांबे: मार्ग क्रमांक २, २अ, ११के, २४, २४अ, ९०, २३५, २३६, ३०१, ३०१अ, के११, के१२, के१३, के१४, के१८ या बसेससह ‘रातराणी १ आणि २’ या बस आता पुलाखालून सुटतील
  • गुजरवाडी बस स्टँड मार्ग: मार्ग क्रमांक ४२, २९८, २९९ आणि ३३९ या बसेस नेहमीप्रमाणे गुजरवाडी स्टँडवरून सुटतील, मात्र प्रवाशांसाठी त्या कात्रज चौकातील पुलाखाली थांबतील.
  • बायपास रोडने धावणाऱ्या बस: मार्ग क्रमांक ४३, ४३अ, ४४, ४५, २१४ आणि २२८ या क्रमांकाच्या बसेस आता थेट कात्रज बायपास रोडने पुढे मार्गस्थ होतील.
  • मार्केट यार्ड आणि बिबवेवाडी परिसरातही मेट्रोच्या कामाला गती आल्यामुळे या भागातील सर्वसामान्य वाहतुकीमध्ये मोठे बदल करून ती इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय
दक्षिण पुणे आणि उपनगरांना जोडणाऱ्या या मुख्य जंक्शनवरून रोज हजारो नागरिक प्रवास करतात. ऐन गर्दीच्या वेळी, विशेषतः सकाळी नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपी प्रशासनाने बदललेल्या थांब्यांवर माहिती फलक लावले आहेत. तसेच प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी घटनास्थळी विशेष कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. भविष्यातील सुकर प्रवासासाठी सध्या होत असलेल्या या तात्पुरत्या त्रासाबद्दल प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ‘PMPML’ आणि मेट्रो प्रशासनाकडून संयुक्तपणे करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!