Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune ZP Result : पुण्यात ‘राष्ट्रवादी’चीचं हवा; 36 जागांवर राष्ट्रवादीची सरशी

Pune ZP Result : पुण्यात ‘राष्ट्रवादी’चीचं हवा; 36 जागांवर राष्ट्रवादीची सरशी

Pune ZP Election Result 2026 : राज्याच्या सत्तेचे केंद्र असलेल्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे. ७ फेब्रुवारीला झालेल्या मतदानानंतर आज पार पडलेल्या मतमोजणीत, उत्तर पुण्यात राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक आव्हानाला लगाम घातला आहे. ७३ जागांपैकी तब्बल ३६ जागांवर आघाडी घेत राष्ट्रवादीने ‘मिनी मंत्रालया’वर आपले वर्चस्व जवळपास निश्चित केले आहे.

अजितदादांच्या निधनानंतरची पहिली कसोटी; ‘राष्ट्रवादी’ची एकजूट यशस्वी

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पुण्यात ही पहिलीच महत्त्वाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्रितपणे दिलेली झुंज यशस्वी ठरताना दिसत आहे. विशेषतः जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि खेड या तालुक्यांत राष्ट्रवादीने टपाली मतदानापासूनच मोठी आघाडी घेतली. भाजपने या भागात प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र प्राथमिक निकाल त्यांच्यासाठी धक्कादायक ठरले आहेत.

पक्षनिहाय सद्यस्थिती: कुणाचे किती पारडे जड? (एकूण जागा – ७३)
सकाळी ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार पुण्याचा कौल असा आहे:

  • राष्ट्रवादी काँग्रेस: ३६ जागा (आघाडीवर)
  • भारतीय जनता पक्ष: १७ जागा
  • शिवसेना (शिंदे गट): १२ जागा
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट): ०५ जागा
  • शिवसेना (ठाकरे गट): ०२ जागा
  • काँग्रेस: ०१ जागा

पंचायत समित्यांतही ‘राष्ट्रवादी’चा बोलबाला
जिल्हा परिषदेपाठोपाठ १४६ जागांच्या पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीने आपला दबदबा कायम राखला आहे. राष्ट्रवादीने तब्बल ७२ जागांवर आघाडी मिळवून निम्म्या जागांवर दावा केला आहे. भाजपने ४८ जागांवर आघाडी घेत कडवी झुंज दिली असली तरी सत्तेचा आकडा गाठताना त्यांची दमछाक होताना दिसत आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला असून केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. पुण्याच्या ग्रामीण पट्ट्यात राष्ट्रवादीची मुळं किती खोलवर आहेत, हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. प्रशासक राज संपवून पुन्हा लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होत असताना पुणेकरांनी अनुभवी हातांनाच पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!