Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात डल्ला; गर्दीचा फायदा घेत 6 तोळ्यांचे दागिने लंपास, दोन सराईत चोरटे अटकेत

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात डल्ला; गर्दीचा फायदा घेत 6 तोळ्यांचे दागिने लंपास, दोन सराईत चोरटे अटकेत

Indurikar Maharaj: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. मात्र, या दिमाखदार सोहळ्याला चोरीच्या घटनेचे गालबोट लागले आहे. लग्नातील गर्दीचा फायदा घेत भामट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील तब्बल सहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी तत्परता दाखवत दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अशी झाली कारवाई
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. चोरी केलेले सोने वाटून घेण्यासाठी दोन आरोपी ममदापूर फाटा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सागर सुरेश कांबळे आणि बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (दोघेही रा. श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा ‘गेम’
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांनी आपल्या इतर दोन साथीदारांच्या (आतिक शेख आणि सनी विलास) मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन, एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

व्हीआयपी उपस्थिती अन् शाही थाट
हा विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या शाही लग्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यासह अनेक मंत्री आणि दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. भव्य मंडप, आकर्षक सजावट आणि हजारो लोकांची उपस्थिती यामुळे या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आपला हात साफ केला. सध्या संगमनेर पोलीस फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध घेत असून, या घटनेमुळे लग्नसराईतील गर्दीत दागिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!