Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अ‍ॅपलने डोनाल्ड ट्रम्प यांना दिला झटका; भारतावर विश्वास व्यक्त करत म्हणाले, आम्ही प्लांट उभारणार…

अ‍ॅपलने डोनाल्ड ट्रम्प यांना दिला झटका; भारतावर विश्वास व्यक्त करत म्हणाले, आम्ही प्लांट उभारणार…

नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरवरील त्यांच्या विधानांमुळे जगभरात चर्चेत आले. दरम्यान, ट्रम्प यांनी आयफोन उत्पादक कंपनी अ‍ॅपलला भारतात प्लांट उभारू नये, असा सल्ला दिला. पण अ‍ॅपल कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन निर्माता कंपनीअ‍ॅपलने स्पष्टपणे सांगितले आहे की, भारतात त्यांची गुंतवणूक सुरूच राहील. तसेच कंपनी आपल्या उत्पादनांसाठी देशात एक मोठे उत्पादन केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांना भारतासोबतच्या व्यावसायिक बाबींपासून दूर राहण्यास सांगितले आहे. “आम्हाला त्यात रस नाही,” ट्रम्प म्हणाले. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. तथापि, ट्रम्प यांच्या विधानानंतरही, अ‍ॅपल भारताला आपले उत्पादन केंद्र बनवण्याच्या आपल्या वचनावर अजूनही ठाम आहे. अ‍ॅपलच्या अधिकाऱ्यांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना आश्वासन दिले की, कंपनीच्या गुंतवणूक योजना अबाधित राहतील. हा देश अ‍ॅपलचा प्रमुख उत्पादन केंद्र बनेल.

ट्रम्प यांनी अ‍ॅपलला काय म्हटले?

खरं तर, ट्रम्प यांनी कतार भेटीदरम्यान अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांच्याशी याबद्दल चर्चा केली. ते म्हणाले की, मला टिम कुकसोबत थोडी समस्या आहे. कुक भारतात एक प्लांट उभारत आहेत. मला अ‍ॅपलने भारतात प्लांट लावावा, असे वाटत नाही. या संभाषणानंतर, अ‍ॅपल आता अमेरिकेत आपले उत्पादन वाढवेल, असा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, आम्हाला भारतात तुमचा प्लांट बांधण्यात रस नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. येथे अ‍ॅपल भारतात प्लांट स्थापन करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे.

२०२६ चे बहुतेक आयफोन भारतात बनवण्याची योजना
पुढील वर्षाच्या अखेरीस बहुतेक आयफोन भारतात बनवले जावेत, अशी अ‍ॅपलची इच्छा आहे. यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी होईल. सध्या, अ‍ॅपल त्यांचे बहुतेक आयफोन चीनमध्ये बनवते आणि अमेरिकेत कोणतेही स्मार्टफोन बनवत नाही. भारतात आयफोनचे उत्पादन वाढले आहे. मार्च २०२५ पर्यंतच्या गेल्या १२ महिन्यांत भारतात २२ अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन तयार झाले. गेल्या वर्षीपेक्षा हे सुमारे ६० टक्के जास्त आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!