Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chhatrapati Sambhajinagar: बाजाराला निघालेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; भरधाव ट्रकच्या धडकेत बाप-लेक ठार

Chhatrapati Sambhajinagar: बाजाराला निघालेल्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; भरधाव ट्रकच्या धडकेत बाप-लेक ठार

Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासाठी घराबाहेर पडलेल्या एका सुखी कुटुंबाचा प्रवास रक्ताच्या थारोळ्यात संपला. खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नंद्राबाद फाट्याजवळ बुधवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात वडील आणि त्यांच्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर छबुलाल सोनवणे (३७) हे आपली पत्नी पूजा (२७) आणि मुलगा शिवा (१.५ वर्ष) यांच्यासह दुचाकीवरून खुलताबादच्या बाजाराला जात होते. दुपारी ४:३० च्या सुमारास नंद्राबाद जवळील एका धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (MH 21 BH 4338) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, किशोर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला.

उपचारादरम्यान चिमुकल्याची प्राणज्योत मालवली
अपघातानंतर जखमींना तातडीने खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या दीड वर्षांच्या शिवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नी पूजा सोनवणे या सध्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्षणार्धात हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने सोनवणे परिवारावर शोककळा पसरली आहे.

चालक फरार, पोलीस तपास सुरू
घटनेची भीषणता पाहून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फरार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका निष्पाप कुटुंबाला नियतीने दिलेली ही जखम कधीही भरून न येणारी आहे. रस्ते सुरक्षा आणि भरधाव वेगावर नियंत्रण असणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा या अपघाताने अधोरेखित केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!