पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, इचलकरंजी महानगरपालिका येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आता अर्ज करता येणार आहे.
इचलकरंजी महानगरपालिका येथे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला इचलकरंजी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही ८ एप्रिल २०२६ रोजी इचलकरंजी महानगरपालिका, स्टेशन रोड, गुरु टॉकीजच्या बाजूला, विकास नगर, इचलकरंजी, महाराष्ट्र, ४१६११५ येथे घेतली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.ichalkaranjinp.co.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


