Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Unseasonal Rain : बळीराजावर अस्मानी संकट! द्राक्ष, आंबा अन् बाजरी भुईसपाट; अवकाळीने शेतकरी पुन्हा हवालदील

Unseasonal Rain : बळीराजावर अस्मानी संकट! द्राक्ष, आंबा अन् बाजरी भुईसपाट; अवकाळीने शेतकरी पुन्हा हवालदील

Unseasonal Rain : राज्यात गेल्या २४ तासांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणापासून ते विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांच्या वर्षावामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

विभागावार पावसाचा आढावा
मराठवाडा (बीड, धाराशिव): बीड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून गेवराई तालुक्यात गारपिटीने बाजरी आणि फळबागांचे नुकसान केले. शहरात सलग तासभर पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. धाराशिवमध्येही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

  • पश्चिम महाराष्ट्र (सोलापूर, सांगली, सातारा): सांगोला आणि आटपाडी भागात गारांच्या पावसाने डाळिंब व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून दुचाकी चिरडली गेल्याची घटना घडली, तर काढणीला आलेली ज्वारी आणि आंबा पिकाचे नुकसान झाले.
  • उत्तर महाराष्ट्र (धुळे, खान्देश): धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिंदखेडा तालुक्याला सलग दुसऱ्यांदा अवकाळीचा तडाखा बसला. सततच्या पावसामुळे उरलीसुरली पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत.
  • कोकण व विदर्भ (सिंधुदुर्ग, वाशिम): सिंधुदुर्गातील सह्याद्री पट्ट्यात पावसाने हजेरी लावल्याने आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. वाशिममध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

शेतकऱ्यांची व्यथा आणि मागणी
रब्बी हंगामातील पिके कापणीला आलेली असतानाच पावसाने हजेरी लावल्याने गहू, हरभरा आणि बाजरी ही पिके जमीनदोस्त झाली आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी आर्त हाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!