Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vijayapura Plane Accident: कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता

Vijayapura Plane Accident: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाची बातमी ताजी असतानाच कर्नाटकातील विजयपूर येथे आणखी एका विमानाचा अपघात झाला आहे. कलबुर्गीवरून बेळगावला जाणारं एक खासगी विमान विजयपूरमधील बबलेश्वर तालुक्यातील मंगळूर गावात कोसळलं. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या वृत्तानुसार, कोसळलेले विमान हे रेड बर्ड कंपनीचे एक खासगी प्रशिक्षण विमान असल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

कलबुर्गीवरून बेळगावसाठी उड्डाण
अपघातग्रस्त विमान हे विमान कलबुर्गीहून बेळगावला जात होतं. उड्डाण केल्यानंतर या विमानात काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला किंवा इंधन संपल आणि हे विमान खाली कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर जवळ असलेल्या मंगळूरू गावाच्या परिसरातील एका शेतात हे विमान जमिनीवर कोसळलं. सुदैवाने या विमानातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी हे अपघातात बचावले आहेत.

या अपघातात सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारांसाठी बीएलडीई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

स्थानिकांची मदतीसाठी तात्काळ धाव
वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे हे प्रशिक्षण विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या विमान अपघाताची माहिती मिळाल्यांतर, ते पाहण्यासाठी गावकऱ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!