Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Amol Mitkari: ‘नरहरी झिरवळांना अडकवण्यासाठी प्री-प्लॅन कट…’; अमोल मिटकरींचा विरोधकांवर खळबळजनक आरोप

Amol Mitkari: ‘नरहरी झिरवळांना अडकवण्यासाठी प्री-प्लॅन कट…’; अमोल मिटकरींचा विरोधकांवर खळबळजनक आरोप

Amol Mitkari: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावर आपली आक्रमक भूमिका मांडत, हा संपूर्ण प्रकार झिरवाळांना बदनाम करण्यासाठी रचलेली एक ‘सोची-समजी साजिश’ असल्याचे म्हटले आहे.

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न?
अमोल मिटकरी यांनी या व्हिडिओच्या टायमिंगवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, हा व्हिडिओ सुमारे 8 महिन्यांपूर्वीचा असून तो मुद्दाम अधिवेशन संपल्यानंतर काही मिनिटांतच का व्हायरल करण्यात आला? भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्याचे लक्ष विचलित करण्यासाठी हा जुना व्हिडिओ बाहेर काढण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. संबंधित ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो असताना केवळ झिरवाळ यांनाच लक्ष्य करणे हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे मिटकरी म्हणाले.

सुनेत्रा पवारांच्या समर्थनामुळे कारवाई?
मिटकरी यांनी या वादाचा संबंध थेट राजकीय घडामोडींशी जोडला आहे. “दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर नरहरी झिरवळ यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. ही मागणी केल्यापासूनच त्यांच्या मागे आधी ‘अँटी करप्शन’ (ACB) लावले गेले आणि आता हा कथित व्हिडिओ समोर आणला गेला,” असा खळबळजनक दावा मिटकरी यांनी केला आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी हा ‘प्री-प्लॅन’ कट रचल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अशोक खरात प्रकरणावर भाष्य
अशोक खरात प्रकरणावर बोलताना मिटकरींनी कडक शब्दात इशारा दिला आहे. “खरातच्या आश्रमात अघोरी पूजा करणाऱ्यांनी हा इशारा समजून घ्यावा,” असे सांगतानाच, अजित पवार यांचा खरातसोबत एकही फोटो नसल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, नरहरी झिरवळ यांच्या या कथित व्हिडिओ प्रकरणामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!