Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नगरमध्ये माणुसकीला काळिमा! कीर्तनकार नराधमाचा अल्पवयीन मुलीवर पाच वर्षे अत्याचार; अंगावर दिले गरम पक्कडीचे चटके

नगरमध्ये माणुसकीला काळिमा! कीर्तनकार नराधमाचा अल्पवयीन मुलीवर पाच वर्षे अत्याचार; अंगावर दिले गरम पक्कडीचे चटके

Parner Crime News: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. वारकरी संप्रदायाचा मुखवटा घालून वावरणाऱ्या या नराधमाने गेल्या पाच वर्षांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. केवळ अत्याचारच नव्हे, तर पीडितेला गरम पक्कडीने चटके देऊन तिचा अमानुष छळ केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

पाच वर्षांचा नरकवास: धमकी आणि अमानुष छळ
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अवघ्या आठवीत असल्यापासून आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती. “हे कोणाला सांगितल्यास तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेन,” अशी धमकी देऊन आरोपीने तिला गेल्या पाच वर्षांपासून गप्प केले होते. १० मार्च रोजी आरोपीने पीडितेला घरी बोलावले, मात्र तिने येण्यास नकार दिल्यावर त्याने तिच्या वडील आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलगी त्याच्या घरी गेली असता, आरोपीने तिला बांबूने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधमाने गॅसवर लोखंडी पक्कड गरम करून पीडितेच्या मांड्यांवर आणि हातावर त्याचे चटके दिले.

भावाच्या सतर्कतेमुळे नराधमाचे पाप चव्हाट्यावर
या अमानुष छळानंतर पीडित मुलगी घराबाहेर रडत बसली असताना तिच्या भावाच्या ही बाब लक्षात आली. भावाने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला हा भयानक आणि काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला. बहिणीची आपबिती ऐकून भावाने विलंब न लावता पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. या तक्रारीमुळेच समाजासमोर ‘महाराज’ म्हणून वावरणाऱ्या या भोंदूचा खरा चेहरा समोर आला आहे.

कायदेशीर कारवाई: भोंदू महाराज पोलीस कोठडीत
पारनेर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रविवारी पहाटे ४ वाजता आरोपी यशवंत थोरातला बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पारनेर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अशा विकृत मानसिकतेच्या ‘भोंदू’ महाराजावर कठोरतम कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!