Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pimpri-Chinchwad Accident : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात भीषण अपघात, 2 बहिणींचा मृत्यू

Pimpri-Chinchwad Accident : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात भीषण अपघात, 2 बहिणींचा मृत्यू

Pimpri-Chinchwad Accident : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज (Accident) भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. धनगर बाबा मंदिरासमोर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला आज नाशिक जिल्ह्यामध्ये देखील भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय 24) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय 20) अशी मृत बहिणींची नावे असून त्या पुण्यातील पुनावळे परिसरातील रहिवासी होत्या. अपघाताच्या वेळी दोघी बहिणी दुचाकी (एमएच 14 केएम 9968) वरुन जात होत्या. याच दरम्यान मागून आलेल्या आयशर ट्रकने (एमएच> 40 डीसी 0964) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की दोघींनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा ट्रक जितेंद्र निराळे (मूळ रहिवासी मध्य प्रदेश) चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काळेवाडी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याबाबत माहिती देताना काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

नाशिकच्या चांदवड – मनमाड रस्त्यावर सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाला होऊन या अपघातात मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहचवले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!