Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Last Rites : अश्रूंच्या महापुरात अजित पवार अनंतात विलीन; सुपुत्र पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी

Ajit Pawar Last Rites : अश्रूंच्या महापुरात अजित पवार अनंतात विलीन; सुपुत्र पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी

Ajit Pawar Last Rites : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि धडाडीचे नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं आणि ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांच्या गजरात त्यांच्या पार्थिवाला त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला.

वडिलांना निरोप देताना सुपुत्राला हुंदका अनावर
सकाळी ११:३० च्या सुमारास अंत्यविधीच्या विधींना सुरुवात झाली. संपूर्ण पवार कुटुंब आणि राजकारणातील दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होती. अजितदादांना अखेरचा निरोप देताना पार्थ पवार यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. जड अंतःकरणाने आणि डोळ्यांतील अश्रू पुसत पार्थ यांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. हा क्षण पाहून उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांनाही रडू कोसळले.

अजित पवारांना मानवंदना

दरम्यान, महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने अजित पवार यांना हवेत गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, विरोधी पक्षनेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. बारामती आणि परिसरातील लाखो लोक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच मैदानावर ठाण मांडून होते.

एका पर्वाचा अंत
अजित पवार यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलण्यात आणि राज्याच्या विकासकामांत मोठे योगदान दिले होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबावर आणि कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिल्यानंतर, उपस्थित सर्वांनीच “दादा, परत या” अशी साद घालत त्यांना निरोप दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!