Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबई उच्च न्यायालयाचा मराठा समाजाला मोठा दिलासा! 2 सप्टेंबरच्या GR ला अंतरिम स्थगिती देण्यास दिला नकार

मुंबई उच्च न्यायालयाचा मराठा समाजाला मोठा दिलासा! 2 सप्टेंबरच्या GR ला अंतरिम स्थगिती देण्यास दिला नकार

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला, ज्याद्वारे कुणबी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले. राज्यातील काही ओबीसी नेते आणि संघटनांनी या निर्णयाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठ, न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड, यांनी 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राज्य सरकारला देखील महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे.

हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला विरोध करत, कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांनी रीट याचिकांद्वारे शासन निर्णयाला आव्हान दिले होते. याचिकांमध्ये 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती, पण उच्च न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली आहे.

हेही वाचा – Dhananjay Munde Dasara Melava: ‘याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात करू नका’; मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंच वक्तव्य, दसरा मेळाव्यात काय काय म्हणाले?

राज्यातील मराठा आरक्षणाविषयी गेल्या काही काळापासून तणावपूर्ण राजकीय वातावरण आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मराठा समाजासाठी आणि राज्य सरकारसाठी महत्त्वाचा मानला जातो, कारण यामुळे प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस कोणताही तात्काळ अडथळा निर्माण झालेला नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!