सोलापूर: सोलापूरमध्ये एका विवादित कार्यक्रमात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थिती लावल्याने राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. ॉया कार्यक्रमाचे आयोजन तडीपार गुंड श्रीशैल हुळ्ळे यांनी केले होते, ज्यामध्ये देशमुख व्यासपीठावरून भाजप शहराध्यक्षावर टीका करताना दिसले. देशमुख यांनी शहराध्यक्षाचे वर्तन चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आणि सांगितले की, जर कोणी बाहेरील पक्षातून येऊन कार्यकर्त्यांना दमदाटी करत असेल, तर त्याच्या कमरेत लाथ घालावी. त्यांनी आपल्या विधानात दमदाटी करणाऱ्यांना कठोर प्रतिसाद देण्याचा सल्ला दिला.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाजासाठी आयोजित बैठकीचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटलं की, ‘समाजाचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास. मी स्वतः वीरशैव लिंगायत आहे आणि समाजाला एकत्र करण्यासाठी मी एक काय दहा बैठक घेईल. यावेळी त्यांनी भाजप शहराध्यक्षांच्या निर्णयावरही टीका केली की, ‘भाजप कार्यकर्त्यांनी समाजाची बैठक न घेण्यास सांगणे चुकीचे आहे.’
हेही वाचा – Maharashtra politics : महायुतीत खदखद..! शिवसेनेचे आमदार अजित पवारांवर नाराज; शिंदेंकडे तक्रारीचा पाऊस
दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, तडीपार गुंड श्रीशैल हुळ्ळे विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे, एका तडीपार गुंडासोबत व्यासपीठावर बसून आणि स्वत:च्या पक्षावर टीका करणाऱ्या आमदार विजयकुमार देशमुखच्या विधानाने सोलापूरमध्ये जोरदार चर्चा सुरु केली आहे. तथापी, आता भाजप नेतृत्वाकडून या घटनेवर कोणती कारवाई केली जाईल, किंवा आमदार विजयकुमार देशमुखच्या या वादग्रस्त विधानावर पक्षाकडून प्रतिक्रिया येईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


