Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Satara: साताऱ्याच्या ‘मिनी कश्मीर’ तापोळ्यात उभा राहतोय सह्याद्रीच्या कुशीतला भव्य केबल-स्टे ब्रिज

Satara: साताऱ्याच्या ‘मिनी कश्मीर’ तापोळ्यात उभा राहतोय सह्याद्रीच्या कुशीतला भव्य केबल-स्टे ब्रिज

Satara: कोकणातून महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आता नवा, सुरक्षित आणि सर्वात जवळचा मार्ग तयार होत आहे. तापोळा ते गाढवली/आहिर या ठिकाणी सुमारे 540 मीटर लांबीचा केबल-स्टे ब्रिज उभारला जातोय सह्याद्रीच्या हिरव्यागार दऱ्यांमध्ये अत्यंत भव्य अशा स्वरूपात. जाणून घेऊयात त्याची वैशिष्ट्य…

या ब्रिजची खास वैशिष्ट्ये:

* केबल-स्टे डिझाईन तीन स्पॅन, मजबूत पायलन, आधुनिक केबलींग

* पुलाच्या मध्यभागी व्ह्यू गॅलरी कोयना बॅकवॉटर, सह्याद्रीची श्रृंखला, सूर्योदयसूर्यास्त एकाच ठिकाणी!

* गॅलरीपर्यंत पोहोचण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट आणि दोन्ही बाजूंनी जिने

* L & T कंपनीकडून वेगवान काम सुरू

प्रवासातील क्रांती:

* रत्नागिरी ते महाबळेश्वर अंतर तब्बल 50 किमीने कमी

* कोकणातून आता आंबेनळी घाटाऐवजी तापोळामार्गे महाबळेश्वरला थेट आणि कमी वेळात पोहोचता येणार

* रघुवीर घाटमार्ग + हा नवा ब्रिज = कोकणसातारा थेट जोडणी

* बामणोलीआपटी दरम्यानचा आणखी एक पूल तयार तापोळासातारा अंतर 1015 किमीने कमी

निसर्ग + तंत्रज्ञान = एक अद्भुत अनुभव:

तापोळा म्हणजेच साताऱ्याचे मिनी कश्मीर हिरवीगार टेकड्या, कोयनेचे अथांग बॅकवॉटर, धुक्याची पांघरूण आणि स्वर्गीय शांतता.

त्याच ठिकाणी आता अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचा केबल-स्टे ब्रिज उभा राहत असल्याने पर्यटकांना

निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आणि इंजिनीअरिंगचं तेज दोन्ही एका ठिकाणी अनुभवता येणार!

परिणाम:

* पर्यटनाला प्रचंड चालना

* स्थानिक व्यवसाय, हॉटेल्स, होमस्टे, शेतकरी यांना भरघोस फायदा

* सातारारत्नागिरी जिल्ह्यांमधील आर्थिक देवाणघेवाण वाढ

साताऱ्याच्या विकासात भर टाकणारा, निसर्गाच्या साक्षीने उभा राहणारा हा पूल आगामी काळात कोकणमहालबळेश्वर पर्यटनाचा गेम-चेंजर ठरणार अशी आशा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!