Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vaishnavi Patil Car Accident: कोल्हापूर एसीबीच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Vaishnavi Patil Car Accident: कोल्हापूर एसीबीच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Vaishnavi Patil Car Accident: कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक पोलीस (DYSP) वैष्णवी पाटील यांच्या कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह आणखी तिघे जण जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना आज पहाटे बेंगळुरूहून कोल्हापूरकडे परतताना घडली. DYSP वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, त्या कारची अचानक समोरून येणाऱ्या लॉरीशी जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताच्या वेळी कारमध्ये असलेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातानंतर जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार DYSP वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी इनोव्हा कार आणि लॉरी यांच्यातील जोरदार धडकेमुळे हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरोच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास कर्नाटक पोलीस करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!