Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा ! किमया पियूष बोरा ठरल्या मिसेस आशिया ग्लोबल क्विन- 2026 विजेतेपदाच्या मानकरी

इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा ! किमया पियूष बोरा ठरल्या मिसेस आशिया ग्लोबल क्विन- 2026 विजेतेपदाच्या मानकरी

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते पियूष संजय बोरा यांच्या सुविद्य पत्नी तसेच इंदापूर शहर भारतीय जैन संघटनेच्या महिला अध्यक्षा किमया पियूष बोरा यांनी पुणे सिंहगड रोड येथील श्री गणेश गार्डन येथे संपन्न झालेल्या मिसेस एशिया ग्लोबल क्विन २०२६ स्पर्धेमध्ये विजेतेपद संपादन केले.

स्टारफेयर्स इव्हेंट च्या पुढाकाराने तसेच एन एम इंटरप्राइजेस व श्री गणेश गार्डन लॉन्स व बँकवेट च्या सहकार्याने या सौंदर्य गौरव राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन नुकतेच पुणे येथे करण्यात आले होते. यावेळी सिनेअभिनेते कलाकार आफताब शिवदेसानी यांच्या हस्ते तसेच इन्व्हेंट ऑर्गनायझर पल्लवी मोरे माने व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत किमया बोरा यांना विजेतेपदाचा मुकुट परिधान करण्यात आला.

सौंदर्य, आत्मविश्वास आणि आत्मगौरव, युवती व महिलांचे सक्षमीकरण हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. विजेतेपदाचा मुकुट संपादन करून आय फोन प्रो १७ जिंकताना किमया बोरा यांनी हा बहुमान पटकावून लक्षवेधी यश संपादन केले. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर १८ वर्षांनी ही स्पर्धा जिंकताना स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन नसते, फक्त पाठपुरावा, मेहनत करणे हे गरजेचे असते हे किमया बोरा यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात स्त्रियांची मानसिकता भीती पोटी ढासळत असताना, लोक नैराश्यात जात असताना सौ. किमया बोरा यांनी सन २०२० मध्ये अतिशय मानाची समजली जाणारी मिस इंडिया युनिव्हर्स क्वारंटाईन क्विन २०२० ही स्पर्धा जिंकून त्यांनी इंदापूर शहराचा गौरव आणि बोरा कुटुंबीयांची शान वाढवली होती. आता २०२६ मध्ये देखील त्यांनी मिसेस एशिया ग्लोबल क्विन २०२६ विजेतेपद जिंकून शहराचा मानसन्मान उंचावला आहे.

स्त्रिया म्हणजे फक्त चूल आणि मूल ही मानसिकता बदलवून त्यांनी मिळविलेले यश नेत्रदीपक असून इतरांनी आदर्श घ्यावा, अनुकरण करावे असेच आहे. या यशामध्ये आई वडिलांची छत्र छाया देणारे संजय बोरा तसेच सुनंदा बोरा ( सासू-सासरे ), खंबीरपणे पाठीशी उभे राहणारा पियूष सारखा हरहुन्नरी नवरा आणि प्रेम आणि तपस्या सारखी दोन गोड गुणी बाळे हीच माझी शक्ती असल्याचे मत किमया यांनी व्यक्त केले.

घर परिवार सांभाळत आपल्या आवडीनिवडी जपत किमया बोरा यांनी मिळवलेले यश इंदापूर तालुक्यातील नारीशक्ती साठी प्रेरणादायक आहे.

या यशाबद्दल नगराध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष धरमचंद लोढा, जैन सोशल ग्रुप चे अध्यक्ष नरेंद्र गांधी, सचिव मिलिंद दोशी, युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष
प्रशांत शिताप यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!