Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kalyan: निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, हत्येचं कारण काय?

Kalyan: निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, हत्येचं कारण काय?

मुंबई: कल्याण-मुरबाड महामार्गावर असणाऱ्या मामणोली गावा जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी या ठिकाणी एक हत्या करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. सात वाजेच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. ही हत्या किरण हेमा घोरड यांची करण्यात आली. करण हे गोवेली या गावचे रहिवाशी होते. विशेष म्हणजे ते शिवसेनेचे पदाधिकारी होते. सध्या कल्याण ग्रामिण भागात अनेक ठिकाणी नगरपालिकांच्या निवडणुका होत आहे. त्याच वेळी ही हत्या झाल्याने वेगवेगळ्या चर्चा होत आहे. मात्र ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असावी असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

किरण घोरड हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. ते मामणोली गावात काही कामासाठी आले होते. त्यावेळी ते तिथल्या साई मिलन धाब्यावर आपल्या सहकाऱ्यांसह थांबले होते. त्यावेळी तिथे आणखी एक गट होता. त्याचे आणि किरण यांचे आधी वाद होते. त्यातील काही जणांनी किरण घोरड यांच्याशी वाद घातला. वाद वाढत गेला. तो इतका वाढला की किरण यांच्यावर थेट चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्ला इथका गंभीर होता की त्यात ते जबर जखमी झाले. विशेष म्हणजे हल्ला करणारे हे सर्व त्यांचेच मित्र होतं. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्लेखोरांनी किरण यांच्या पोटावर, पाठीवर‌ व डोक्यावर वार केले होते.

ही बातमी सगळीकडे वाऱ्या सारखी पसरली. त्यानंतर गोवेली तसेच मामणोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कुठलीही अनपेक्षित परिस्थिती उद्भवू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. या हत्येनंतर पोलीसांनी तातडीने कारवाई केली आहे. शिवाय शोध ही सुरू केला आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मृत व्यक्तीच्या अलीकडील हालचाली, संपर्कातील व्यक्ती, मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहार आणि तणावग्रस्त संबंध अशा सर्व बाबींची चौकशी पोलीस करत आहेत. या प्रकरणी काही महत्वाच्या गोष्टी पोलीसांच्या हाती लागल्या असल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेने नंतर स्थानिक नागरिक हे आक्रमक झाले आहेत. नागरिकां सोबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी केली आहे. शिवाय हत्या का आणि कशासाठी केली कोणाच्या सांगण्यावरून झाली याचाही तपास पोलीसांनी करावा अशी मागणी जोर धरत आहे. या हत्याकांडामागील नेमके कारण उलगडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार केली आहेत. धागेदोऱ्यांवरून पुढील काही तासांत तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीसांसमोर आता या हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!