Today बुधवार, 5th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! ज्योतिबा मंदिरात भाविकांना पुजाऱ्यांकडून बेदम मारहाण; 15 पुजाऱ्यांसह 30 जणांवर गुन्हे दाखल

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! ज्योतिबा मंदिरात भाविकांना पुजाऱ्यांकडून बेदम मारहाण; 15 पुजाऱ्यांसह 30 जणांवर गुन्हे दाखल

Kolhapur Crime: कोल्हापूरचे आराध्य दैवत असलेल्या वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिर परिसरात भाविक आणि पुजारी यांच्यात झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे खळबळ उडाली आहे. परिते गावातील भाविकांना १५ ते २० पुजाऱ्यांनी लाथा-बुक्क्यांनी आणि डोक्यात नारळ मारून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात पुजारी भाविकांवर अक्षरशः तुटून पडल्याचे दिसत आहे. याप्रकरणी कोडोली पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या १५ पुजारी आणि १५ भाविक अशा एकूण ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

नेमका वाद कशामुळे? उलटसुलट चर्चांना उधाण
ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी दोन परस्परविरोधी दावे समोर येत आहेत. भाविकांनी मद्यप्राशन करून हुल्लडबाजी केली आणि देवाच्या छबिन्यासोबत छेडछाड केली, असा आरोप पुजाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मात्र, परिते ग्रामस्थांनी आणि सरपंच मनोज पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पुजाऱ्यांनीच वादाला सुरुवात करून भाविकांना मारहाण केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, या घटनेच्या निषेधार्थ परिते गावात भव्य ‘निषेध फेरी’ काढण्यात आली.

पोलीस प्रशासनासमोर आव्हान; भाविकांमध्ये संतापाची लाट
ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच मंदिराच्या पवित्र परिसरात असा प्रकार घडल्याने भाविकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!