Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाडमधील पशुसंवर्धनची जागा कुणबी, बुरुड समाजास देण्याचा निर्णय

महाडमधील पशुसंवर्धनची जागा कुणबी, बुरुड समाजास देण्याचा निर्णय

रायगड: महाड नवेघर येथील २५ एकर जमिनीपैकी तीन गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड समाजाला समाज मंदीर आणि विद्यार्थी वसतिगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील १५ दिवसात प्रस्ताव देण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, बुरुड समाजाने सामाजिक कामासाठी जागा मागितली आहे. ही जागा ही जिल्हा परिषदेची असून ती पशुसंवर्धन विभागाला २००८ साली देण्यात आली आहे. ती जागा पशुसंवर्धन विभागाने विकसित केलेली नसून सध्या ही जागा बुरुड समाजाला आवश्यक असल्याने त्यांना देण्यात यावी. त्याच्या बदल्यात रायगड जिल्हाधिकारी यांनी महाड शहरात महसूल विभागाची उपलब्ध असलेली जागा पशुसंवर्धन विभागाला द्यावी, असे आदेशही मंत्री बावनकुळे यांनी दिले.

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले, पशुसंवर्धन आणि महसूल विभागाने या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेतला हे महत्त्वपूर्ण आहे. विकासाच्या दृष्टीने असे निर्णय योग्य ठरतात. जिल्हाधिकारी यांनी तातडीने याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा.

जागेची अदलाबदली आणि बुरुड समाजाला अटी शर्तींवर जागा उपलब्ध करुन देण्याबाबत असे दोन प्रस्ताव सादर करण्यात यावेत, अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!