Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ladki bahin yojana: लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी! रखडलेले हप्ते मिळणार; अर्ज दुरुस्ती अन् ई-केवायसी करा ‘या’ तारखेपर्यंत

Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. तांत्रिक चुकांमुळे ज्या महिलांना मिळणारा लाभ थांबला होता, त्यांना आपल्या अर्जात सुधारणा करण्यासाठी आता ३१ मार्च २०२६ पर्यंतची शेवटची संधी देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांपासून वंचित असलेल्या हजारो लाभार्थी महिलांना मोठा आधार मिळाला आहे.

नेमकी अडचण काय होती?
योजनेच्या सुरुवातीला अर्ज भरताना झालेल्या घाईगडबडीमुळे अनेक महिलांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते. विशेषतः ‘नाही’ ऐवजी ‘हो’ अशा तांत्रिक निवडीमुळे प्रणालीने अनेक पात्र अर्ज नाकारले होते. या तांत्रिक त्रुटी दूर करून माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने ही अंतिम मुदतवाढ दिली आहे.

कोणाला मिळणार दुरुस्तीची संधी?
ज्यांचे अर्ज मंजूर आहेत, पण खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही.ज्यांच्या बँक खात्याच्या माहितीत त्रुटी आहेत. ज्यांनी अद्याप आधार कार्डचे प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही. ज्यांचे बँक खाते डीबीटी (DBT) साठी लिंक किंवा सक्रिय नाही अशा लाभार्थी महिलांना अर्ज दुरुस्तीची संधी मिळणार आहे.

नाव आणि तांत्रिक विसंगती दूर होणार
अनेक महिलांच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव यात तफावत असल्याने त्यांचे हप्ते रखडले होते. आता ३१ मार्चपर्यंत ही दुरुस्ती केल्यास, रखडलेल्या थकीत हप्त्यांसह पुढील सर्व लाभ महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

ही शेवटची संधी!
जिल्हा प्रशासनाकडून सर्व पात्र लाभार्थी महिलांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी दिलेल्या मुदतीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ३१ मार्च २०२६ नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे तांत्रिक कारणास्तव लाभ बंद झालेल्या महिलांनी तातडीने आपली माहिती अपडेट करावी.

फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते. या योजनेतून दरमहा महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील महिलांचं लक्ष लागलं होतं. सामाजिक न्याय विभागाकडून 277 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्यानं येत्या काही दिवसांमध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहि‍णींना दिला जाऊ शकते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!