Flood Relief Norms Change: राज्यातील बळीराजाला आधार देण्यासाठी फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी सरकारने जुन्या जाचक नियमांत बदल करून मदतीचा ओघ वाढवला आहे. कर्जमाफीसोबतच आता पशुपालकांसाठीही मदतीची द्वारे खुली करण्यात आली आहेत.
मदतीचे नियम बदलले; कोणाला होणार फायदा?
पूर्वी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाच मदतीसाठी पात्र मानले जात होते. मात्र, आता नव्या निर्णयानुसार सर्व बाधित पशुपालक मदतीसाठी पात्र ठरतील. याशिवाय, जनावरांच्या संख्येवर असलेली मर्यादाही सरकारने शिथिल केली आहे.
प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत
- मर्यादा हटवली: पूर्वी ठराविक संख्येपर्यंतच जनावरांची मदत मिळत असे (उदा. कमाल ३ दुधाळ जनावरे). आता मात्र पुरात मृत पावलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या सर्व जनावरांसाठी सरकार मदत देणार आहे.
- कुक्कुटपालन: पक्ष्यांच्या संख्येवर असलेली मर्यादा काढून टाकण्यात आली असून, सर्व मृत पक्षांची भरपाई दिली जाईल.
- भूमिहीन पशुपालक: ज्यांच्याकडे जमीन नाही पण पशुपालन करतात, अशा बाधित व्यक्तींनाही आता सरकारी मदतीचा लाभ मिळेल.
कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ
अतिवृष्टीच्या मदतीसोबतच सरकारने पीक कर्जमाफीचाही आढावा घेतला आहे:
१. दोन लाखांची कर्जमाफी: ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत माफी मिळेल.
२. नियमित कर्जदारांना लाभ: जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.


