Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Electricity Bill: पुणेकरांना सुखद धक्का! 1 एप्रिलपासून घटणार वीज बिल

Pune Electricity Bill: पुणेकरांना सुखद धक्का! 1 एप्रिलपासून घटणार वीज बिल

Pune Electricity Bill: कडाक्याच्या उन्हामुळे एसी आणि कुलरचा वापर वाढलेला असतानाच पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. १ एप्रिलपासून घरगुती वीज दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे पुणे परिमंडळातील लाखो ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. महावितरणने सादर केलेल्या दर कपातीच्या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिली आहे.

बिलात नेमकी किती होणार बचत?
नव्या निर्णयानुसार, घरगुती वीज दरात सरासरी ३० पैसे प्रतियुनिट इतकी कपात करण्यात आली आहे. एकीकडे ‘वहन आकार’ (Wheeling Charges) १३ पैशांनी वाढून १.६० रुपये झाला असला, तरी मूळ वीज दरातील कपात मोठी असल्याने ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी होणार आहे. पुणे परिमंडळातील सुमारे ३८ लाख ग्राहकांची यामुळे महिनाकाठी एकत्रित १० कोटी रुपयांची बचत होणार आहे.

दर कमी होण्यामागची कारणे:
वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा, इंधन आणि इतर कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना दिला जात आहे. हा दिलासा केवळ तात्पुरता नसून, २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दर कमी करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. महावितरणसह टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीनेही दर कपातीचे प्रस्ताव मांडले होते.

पुणे परिमंडळातील कोणाला होणार फायदा?
पुणे शहर, हवेली, आंबेगाव आणि राजगुरुनगर या भागांतील ३८ लाख ७१ हजार ग्राहकांना या स्वस्त वीज दराचा लाभ मिळेल. यामध्ये प्रामुख्याने:

  • घरगुती ग्राहक: ३३ लाख ८७ हजार
  • वाणिज्यिक (Commercial) ग्राहक: ३ लाख ९५ हजार
  • औद्योगिक ग्राहक: ५७ हजार ५६०
  • कृषिपंप धारक: १ लाख १ हजार
Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!