Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नांदेड हादरले! ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेत बलात्कार; नराधम शिक्षकाचं भयानक कृत्य

नांदेड हादरले! ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेत बलात्कार; नराधम शिक्षकाचं भयानक कृत्य

नांदेड : महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्राला धक्का देणारी धक्कादायक घटना नांदेड शहरात उघडकीस आली आहे. एका इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील ७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवरच बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी घडली आहे. यानंतर तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणाने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दररोज शाळेत जायची. मात्र, २० नोव्हेंबरला तिने शाळेत जाण्यास नकार दिल्याने आईला संशय आला. सतत विचारल्यानंतर मुलीने रडत-रडत सांगितले की, शाळेतील इंग्रजी शिक्षक विशाल लोखंडे याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार ऐकून आई अवाक झाली आणि तिने तात्काळ भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२), ६५(२), ३५१(२) आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजन यांनी सांगितले की, आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात येईल, जेणेकरून पीडितेला लवकर न्याय मिळेल. तपास सुरू असून, शाळेतील इतर विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेने “विद्येचं मंदिर” असलेल्या शाळेत मुली सुरक्षित नाहीत ही वास्तविकता समोर आल्याने पालकांमध्ये भीती पसरली आहे.

नुकताच नाशिकच्या मालेगावमध्ये ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या झाल्याची घटना घडली होती. आता नांदेडमधील हा प्रकार पाहता, बालकांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि सतर्कता आवश्यक आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!