बीड: जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानीच गांजाचे सेवन होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या निवासस्थानी एका कर्मचाऱ्याकडून गांजाचे सेवन होतं असल्याची बाब उघडकीस आली आहे.
त्यानंतर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या ही गोष्ट बाब येताच त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच सदर कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी केली असून त्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


