Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Buldhana Accident: शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी

Buldhana Accident: शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी

Buldhana Accident: रस्ते महामार्गावरील अपघातांच्या (Accident) घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. आता, बुलढाणा-छत्रपती (Buldhana) संभाजी नगर महामार्गावरील धाड गावाजवळ जवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला असून अपघातात दुचाकीवरील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. तर, स्थानिकांना धाव घेत रुग्णवाहिकेलाही पाचारण केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.

छत्रपती संभाजी नगरहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला भरधाव दुचाकी धडकली, या दुचाकीवरुन तीन जण प्रवास करत होते. धाड गावाजवळ या दुचाकीने बसला जोराची धडक दिल्याने टु व्हिलरवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले, रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले.

मात्र, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा तालुक्यातील ढाल सावंगी गावातील कैलास दांडगे, रवी चंदनशिव व अंकुश पाडळे अशी मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे तीनही तरुण 20 वर्षे वयाच्या आतीलच असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, तर अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याचंही पाहायला मिळालं.

आणखी एक अपघात, 10 जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा-बुऱ्हाणपूर मार्गावर वडाप टॅक्सीचा भीषण अपघात झाल्याची दुसरी घटना घडली आहे. भरधाव टॅक्सी मार्गालगत खड्ड्यात पलटी झाल्याने टॅक्सीतील दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातानंतर नांदुरा बुऱ्हानपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!