Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने सिताफळ बागेवर फिरविला जेसीबी ! दोन लाखाचे नुकसान, कर्ज काढून लावली होती बाग

वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने सिताफळ बागेवर फिरविला जेसीबी ! दोन लाखाचे नुकसान, कर्ज काढून लावली होती बाग

कळंबः तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी भारत चोंदे यांनी कमी दाबाने वीजपुरवठा तर कधी ट्रान्स्फर जळाल्याने सिताफळ बाग जोपासणे अवघड होत असल्याने बागेवर जेसीबी फिरवला. तांदुळवाडी शिवारातील स्वतःच्या शेतात शेतकरी चोंदे यांनी सिताफळ बागेची लागवड सन २०१९ मध्ये केली होती. गत दोन ते तीन वर्षांपासून कधी कमी विद्युत पुरवठा, तर कधी ट्रान्स्फर जळाल्याने शेतात वीजपुरवठा ठप्प होत होता. संबंधीत डिपीवरुन अनधिकृत जोडण्यामुळे डिपीवर खूप लोड येत होता. कमी दाबाने वीजपुरवठा होत होता. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होते. यामुळे चोंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

गेल्यावर्षी नियोजन समितीच्या बैठकीत प्रताप डिकले यांच्या शेतामध्ये नविन डिपी उभारण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने आणि वारंवार ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली सिताफळ बाग चोंदे यांनी शेतात जेसीबी फिरवून नष्ट केली. चोंदे यांनी व्याजाने पैसे घेऊन व बँकेकडून कर्ज काढून सिताफळ लागवड केली होती. लागवडीसाठी लाखो रुपये खर्च केला, पण मजुरीचाच काय लागवडीचाही खर्च निघाला नाही. मोठे नुकसान झाल्यामुळे ‘चोंदे यांनी सिताफळ बागेवर जेसीबी फिरवून बाग नष्ट केली.

वीजेच्य समस्येमुळे नुकसान

दोन एकर शेतात सिताफळ लागवड केली होती. या बागेवर कमीत कमी दोन लाखांपेक्षा जास्त खर्च केला. मात्र वीज समस्येमुळे हातात एक रुपयासुध्दा आला नाही. सरकारने शेतीसाठी पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा.

– भारत चोंदे (शेतकरी)

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!