Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed Crime : बीडमध्ये एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय समन्वयकावर जीवघेणा हल्ला

Beed Crime : बीडमध्ये एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय समन्वयकावर जीवघेणा हल्ला

बीड : बीड जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीच्या दोन धक्कादायक घटनांनी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला केला, तर दुसरीकडे प्रेमाच्या त्रिकोणातून एका होमगार्ड महिलेची मैत्रिणीनेच निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही घटनांनी बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वैद्यकीय समन्वयकावर मध्यरात्री हल्ला

बीडमधील पालवन येथे राहणारे विलास मस्के, जे गेल्या तीन वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी मस्के यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना बाहेर काढले आणि धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात मस्के यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मस्के यांच्या बहिणीलाही हल्लेखोरांनी जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मस्के यांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस वेगवेगळ्या दिशांनी तपास करत आहेत.

प्रेमाच्या त्रिकोणातून होमगार्ड महिलेची हत्या

तर दुसरीकडे बीडच्या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या अयोध्या वरकटे या महिलेची तिच्याच मैत्रिणीने प्रेमाच्या त्रिकोणातून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी वृंदावनी फरताळे आणि अयोध्या या दोघींचे एकाच तरुणावर प्रेम होते. अयोध्याला प्रेमाच्या मार्गातील अडथळा समजून वृंदावनीने तिला घरी बोलावून हत्या केली आणि मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला.

शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत वृंदावनी फरताळेला ताब्यात घेतले आहे. तसेच, या हत्येत प्रियकराचा सहभाग आहे का, याचा तपासही सुरू आहे. या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!