Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

18 हजार रुपयांची मागणी करणारे लाचखोर मुख्याध्यापक, लिपिक जाळ्यात; एसीबीने केलेल्या घराच्या झाडाझडतीत सापडले साडेनऊ लाख

18 हजार रुपयांची मागणी करणारे लाचखोर मुख्याध्यापक, लिपिक जाळ्यात; एसीबीने केलेल्या घराच्या झाडाझडतीत सापडले साडेनऊ लाख

परभणी : प्रलंबित वेतनातून 18 हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारताना खान लिपीक बुढन खान महेबूब खान पठाण (53) यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचेची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापिका सिद्दीकी अहेमदी मोहम्मद अब्दुल मजीद (57) व लिपिक अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार 19 मार्च रोजी ही कारवाई केली.

या प्रकरणी तक्रारदार यांनी 17 मार्च रोजी पर्यवेक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यात तक्रारदाराला लोकसेवक बुढन खान पठाण यांनी तुम्हाला एप्रिल ते सप्टेंबर 2024 या सहा महिन्यांचे प्रलंबित वेतन मिळाले आहे. त्या वेतनातून एका महिन्याचे 3000 रुपये असे 6 महिन्याचे एकूण 18000 रुपये मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी यांनी मागितले आहेत. तक्रारदार यांनी लोकसेविका सिद्दिकी अहेमदी यांची भेट घेतली असता त्यांनी 18000 रुपये उद्या आणून द्या, असे म्हटल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीची 18 मार्च रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली, त्यानंतर बुधवारी (दि. 19) रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई केली. दरम्यान तक्रारदाराने लोकसेविका अहेमदी सिद्दिकी यांना 18000 रुपये आणले आहेत, असे सांगितले. त्यावर सिद्दिकी अहेमदी यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम लोकसेवक बुढन खान पठाण यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यावरून ही रक्कम स्वीकारताना आरोपी लोकसेवक बुढन खान महेबुब खान पठाण यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले.

यावेळी आरोपी लोकसेविका सिद्दिकी अहेमदी यांच्या जवळून 9840 रुपये आणि 1 मोबाईल तसेच घराची झडती घेतली असता परभणी येथील निवासस्थानी 9 लाख 50 हजार रूपये मिळाले. तसेच आरोपी लोकसेवक बुढन खान यांच्या जवळून लाचेची रक्कम 18000 आणि 5190 व 1 मोबाईल जप्त केला. आरोपी बुढन खान पठाण यांच्या परभणी येथील घराची घरझडती कार्यवाही सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!