Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mahadev Jankar : शरद पवारांसाठी महादेव जानकर बनले ढाल, OBC हितासाठी पवारांचे योगदान, टीकाकारांना सणसणीत प्रत्युत्तर

Mahadev Jankar : शरद पवारांसाठी महादेव जानकर बनले ढाल, OBC हितासाठी पवारांचे योगदान, टीकाकारांना सणसणीत प्रत्युत्तर

जालना : राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ पुढे येत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने टीका करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे. जानकर म्हणाले, “ओबीसीच्या हिताचा निर्णय शरद पवार यांनीच घेतला आहे. आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, फळ नसलेल्या झाडाला कोणी मारत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने क्रांती दिनाचे औचित्य साधून नागपूर येथून सुरू केलेल्या मंडल यात्रेला आज जालना येथे स्वागत करण्यासाठी स्वतः महादेव जानकर उपस्थित होते. ही यात्रा ओबीसी समाजाच्या हिताचे प्रश्न घेऊन निघाली आहे. शरद पवारांनी ओबीसी समाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असं सांगत जानकर यांनी पवारांवरील टीकेचा समाचार घेतला. विशेषतः लक्ष्मण हाके आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या नेत्यांनी शरद पवारांवर केलेल्या आक्रमक टीकेला जानकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांवर अनेक नेत्यांची टीका

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. याचवेळी, शरद पवार यांच्या मंडल यात्रेवर महायुती आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तर गंभीर आरोप करत म्हटले की, “विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या स्कॉलरशिपला राष्ट्रवादीने विरोध केला होता. श्रीमंत मराठा हा एनसीपीचा आधार आहे, त्यामुळे ओबीसींना त्यांच्या विरोधात जाऊ नये यासाठीच ही यात्रा आहे.

महादेव जानकरांचा जोरदार पलटवार

महादेव जानकर यांनी मात्र या टीकांना न जुमानता शरद पवार यांच्या योगदानाला दुजोरा दिला. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असलेले जानकर यांनी आता महायुतीपासून फारकत घेतली आहे. अलीकडेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर ते ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात दिसले होते. त्यांनी भाजप आणि महायुती सरकारवरही सडकून टीका केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जानकर महाविकास आघाडीसोबत येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!