Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्र हादरला..! पत्रकाराच्या मुलाची हत्या; वदर्ळीच्या परिसरातच केले सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

महाराष्ट्र हादरला..! पत्रकाराच्या मुलाची हत्या; वदर्ळीच्या परिसरातच केले सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Beed Crime : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा सावळा चेहरा पुन्हा समोर आला असून, स्थानिक वर्तमानपत्राच्या पत्रकार देवेंद्र ढाका यांच्या २२ वर्षीय मुलाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यश देवेंद्र ढाका असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. माने कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी (२५ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजता घडलेल्या या भयानक घटनेने संपूर्ण बीड शहरात खळबळ उडाली आहे.

महिन्याभरापूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणाची खुन्नस काढण्यासाठी आरोपी सुरज काटे याने यशच्या छातीत दोन वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या हत्येने बीडमधील कायदा-सुव्यवस्था अवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिस तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर सहभागींचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, यश ढाका हा अभियांत्रिकीचे (इंजिनीअरिंग) शिक्षण घेणारा तरुण होता. तो बीड शहरातील एका स्थानिक वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या देवेंद्र ढाका यांचा एकुलता एक मुलगा होता. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास माने कॉम्प्लेक्स परिसरात यश आणि त्याचा मित्र सुरज काटे यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला.

साधारण महिन्यापूर्वी वाढदिवस साजरा करताना दोघांमध्ये झालेल्या भांडणाची जखम अजूनही ताज्या असल्याने हा वाद तीव्र झाला. वाद वाढताच सुरजने सोबत असलेला धारदार चाकू काढला आणि यशच्या छातीत दोन वार केले. हे वार इतके घातक होते की, ते आरपार गेले आणि यश तात्काळ जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशला त्याचे मित्रांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, हल्ल्यानंतर सुरज काटे फरार झाला होता, पण पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याला अटक केली आहे.

या हत्येचे मूळ कारण साधारण एक महिन्यापूर्वी घडलेले आहे. यश आणि सुरज हे दोघे मित्र असल्याने त्यांनी एकत्र वाढदिवस साजरा केला होता. या पार्टीत अल्पसा वाद झाला, जो वाढत गेला आणि दोघांमध्ये दीर्घकाळ टिकणारे वैर निर्माण झाले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे वैरच हत्येचे मुख्य कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मात्र, ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने, पोलिसांना शंका आहे की सुरज एकटा नव्हता. इतर कोणताही सहभागी असल्यास त्यांचा शोध घेण्यासाठी तपासाला वेग देण्यात आला आहे. यशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून, घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला आहे. बीड शहर पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ एका आरोपीला (सुरज काटे) अटक केली असून, त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!