Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लातूरमध्ये ACBचा सापळा! पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक, पोलिस दलात खळबळ

लातूरमध्ये ACBचा सापळा! पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक, पोलिस दलात खळबळ

Latur Police : लातूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) मोठी कारवाई करत पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार पुजारी यांना ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली असून या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. ही मागणी पोलिस कर्मचारी राहुल नागरगोजे यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. एसीबीने सापळा रचत दोघांनाही लाच घेताना पकडले.

सध्या एसीबीकडून राजकुमार पुजारी यांच्या घराची झाडाझडती सुरू असून दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे लातूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नाशिकमध्येही एसीबीने अशाच प्रकारची कारवाई करत बांधकाम विभागातील अधिकाऱ्याला ३ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. या दोन्ही घटनांमुळे राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात ACBची कारवाई अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!