परभणी : परभणी जिल्ह्यात एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी नावंदे यांनी अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामधील, दीड लाखांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
यामुळे परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचे बिल देण्यासाठी आणि स्विमिंग पुलच्या मान्यतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी लाचेची मागणी केली होती. नावंदे यांनी या मंजुरीसाठी संबंधित व्यक्तीकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती, ज्यामध्ये दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


