Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Mumbai Crime: बोलत नाही म्हणून 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार, आरोपी युवक अटकेत, मुलुंडमधील प्रकार

Mumbai Crime: बोलत नाही म्हणून 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार, आरोपी युवक अटकेत, मुलुंडमधील प्रकार

Mumbai Crime: मुलुंड परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका तरुणाने 16 वर्षीय मुलीवर तिच्या ओळखीच्या मुलाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या मित्रावरही हल्ला करण्यात आला आहे.आशिष बनसोड असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुलुंड हल्ल्याची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूर येथील रहिवासी असून एकमेकांना ओळखत होते. काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने आरोपीशी बोलणं बंद केलं होते. याच रागातून आरोपीने मुलुंडमध्ये तिच्या कॉलेजजवळ तिला गाठलं आणि सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. तिच्यासोबत असलेल्या मित्रालाही त्याने गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर दोघांनाही जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली.

आरोपी अटकेत
या घटनेनंतर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला कोयत्यासह अटक केली आहे. आशिष बनसोड याच्यावर यापूर्वीही बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास मुलुंड पोलीस करत आहेत.

महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न
ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर समाजातील वाढत्या असुरक्षिततेची, विशेषतः महिलांविरोधातील हिंसेची भीषण वास्तवता दाखवणारी आहे. एका मुलीने बोलण्यास नकार दिल्याने तिच्यावर अशा प्रकारे हल्ला होतो, ही बाब मन हेलावून टाकणारी आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! केंद्र सरकारची रॉकेल वाटपास मंजुरी; प्रत्येक कुटुंबाला किती लिटर केरोसीन?

वाढती गुन्हेगारी आणि गरज कडक उपाययोजनांची
मुंबईसारख्या शहरात अशा घटना सातत्याने घडत असून ही चिंतेची बाब आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक कायदे, पोलिसांची सतर्कता आणि समाजातील जागरूकता वाढवणे अत्यावश्यक आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!