Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Police Death : पत्नीशी वाद अन् पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

Police Death : पत्नीशी वाद अन् पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबई : नवी मुंबईतील सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी उलवे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, उलवे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ही आत्महत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उलवे येथे राहणारे स्वप्निल लोहार हे सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवार, 11 सप्टेंबर 2025 रोजी घरी एकटे असताना त्यांचे पत्नीसोबत फोनवर बोलणे झाले. या संभाषणादरम्यान दोघांमध्ये तीव्र वाद झाला. या वादानंतर स्वप्निल यांनी टोकाचा निर्णय घेत घरात गळफास लावून आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

उलवे पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्वप्निल लोहार यांचे पत्नीसोबत झालेले भांडण हे आत्महत्येचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती गोळा करण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!