Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बदलापुरात शिंदे गट-भाजप संघर्ष पुन्हा पेटला; भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण

बदलापुरात शिंदे गट-भाजप संघर्ष पुन्हा पेटला; भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण

Badlapur News : बदलापुरात शिंदे गट आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पालिका निवडणुकीनंतर वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मारहाण झालेल्या तरुणाचं नाव सनी पाटील असं आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे नगरसेवक रोहन पाटील, माजी नगरसेवक सूरदास पाटील यांच्यासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, सनी पाटील यांचे वडील मारुती पाटील यांनी पालिका निवडणुकीत रोहन पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये तणाव वाढला होता. नुकत्याच एका हळदी समारंभात दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी वाद वाढून सनी पाटील यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याआधीही जानेवारी महिन्यात शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे बदलापुरातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!