Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज; महसूलमंत्री बावनकुळे यांचा शेतकऱ्यांना दिलासा

भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज; महसूलमंत्री बावनकुळे यांचा शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई: राज्यातील भोगवटादार वर्ग-२ म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून, आता भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारणकर्ज देता येणार आहे, याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले. सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी ११ मार्च रोजी भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीबाबत बैठक घेऊन हा प्रश्न महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता.

महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय केवळ एका बँकपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील सर्वच भोगवटादार वर्ग-२ खातेधारकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी बँकेला तारण घेता येतील, असा निर्णय घेतला. यापूर्वी १९९० मध्ये याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले होते. आता त्याचे स्मरणपत्र महसूल विभागाने निर्गमित केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र एखादा शेतकरी कर्ज परतफेड करू शकला नाही, तर बँक अडचणीत येते. अशावेळी अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगवटा वर्ग-२ असेल तर त्यावर बोजा चढवता येत नाही, असे बँकांचे म्हणणे होते.

त्यामुळे भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी, बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत. याबाबत्चे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!