मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आता कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला. करुणा शर्मा मुंडे यांना महिना २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. करुणा शर्मा मुंडे यांनी १५ लाख रुपये महिना पोटगी मागितली होती. पण न्यायालयाने करुणा मुंडेंना दरमहा १ लाख २५ हजार आणि मुलगी शिवानीसाठी ७५ हजार असे महिन्याकाठी २ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. दरम्यान, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याने अंतरिम देखभालीसाठी करुणा शर्माला दरमहा २ लाख दिले जावेत, असे आदेशात म्हटले आहे. त्याला पोटगी म्हणू शकत नाही, असे धनंजय मुंडेंचे वकील शार्दुल सिंग यांनी म्हटले.
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणी तक्रार केली होती. यासंदर्भात वांद्रे फॅमिली कोर्टाने हे आरोप मान्य करीत करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रुपये देण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या निकालानंतर करुणा शर्मा यांनी कोर्टातून मला न्याय मिळाला, न्यायालय आणि न्यायाधीशांचे आभार मानते. मुले सोबत असल्याने तिघांना प्रत्येकी ५ लाख मिळतील, अशी मागणी होती. पण मला २ लाख मिळणार आहेत.


