पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज (दि. ७) सकाळच्या सुमारास घडला असून आळेफाटा येथे खासगी बसला कंटेनरने पाठीमागून धडकल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात ४० ते ५० प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
५० ते ६० प्रवाशांना घेऊन खासगी बस पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघाली होती. आळेफाटा येथे बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस समोरच्या कंटेनरला धडकली. सदर अपघातात ४० ते ५० प्रवासी जखमी झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पोलिसांनी या अपघाताची दखल घेत पुढील तपास देखील सुरु केला आहे. घटनास्थळी आपत्कालीन पथकाने धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे.


