Mumbai Local : डोंबिवली स्थानकाजवळ सोमवारी सकाळी लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली असून त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणारी ही लोकल डोंबिवली परिसरात असताना हा प्रकार घडला. (Mumbai Local)
सुदैवाने, ही लोकल ट्रेन रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने या मार्गावरील इतर लोकल गाड्यांवरही परिणाम झाला असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. (Mumbai Local)
घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ऐन ऑफिस वेळेत प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून पुढील काही तास सेवा सुरळीत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. (Mumbai Local)


