Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election 2026: अरुण गवळीच्या लेकी निवडणुकीच्या रिंगणात; दोन्ही लेकींनी दाखल केले उमेदवारी अर्ज

BMC Election 2026: अरुण गवळीच्या लेकी निवडणुकीच्या रिंगणात; दोन्ही लेकींनी दाखल केले उमेदवारी अर्ज

BMC Election 2026: आगामी महापालिका निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याशिवाय ठाकरे बंधुच्या युतीच्या घोषणेनंतर राजकारणात एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

यातच आता महापालिका निवडणुकीत मुंबईचा डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी आणि योगिता गवळी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. दोघींनीही अखिल भारतीय सेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

योगिता गवळी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात

गीता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 212 मधून तर योगिता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 207 मधून आपले नामनिर्देशन दाखल केले आहे. गीता गवळी या माजी नगरसेवक असून त्या यापूर्वी सलग निवडून आल्या आहेत. दुसरीकडे, योगिता गवळी या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय पदार्पण ठरणार आहे.

काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय सेनेच्या आणि अरूण गवळीच्या भावजई वंदना गवळी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ती जागा आता अरुण गवळींची मुलगी योगिता लढणार आहे. योगिता गवळी हिने काकी वंदना गवळी यांच्या विरोधात 207 मधून अर्ज भरला आहे.

१८ वर्षानंतर अरुण गवळी जामीन मंजूर

मुंबईत २००७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड डॅडी उर्फ अरुण गवळी तुरुंगाबाहेर आला आहे. या प्रकरणात १८ वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!