Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; पाहा तुमच्या शहरातील आजचे भाव

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; पाहा तुमच्या शहरातील आजचे भाव

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळत असून, गुंतवणूकदारांना दिलासा मिळालेला नाही. जागतिक बाजारातील घडामोडी आणि नफा वसुलीसाठी (Profit Booking) झालेल्या विक्रीमुळे मौल्यवान धातूंच्या किमती दबावात आल्या आहेत. सोमवारी दिल्लीत चांदीचे दर प्रतिकिलो 2.66 लाख रुपयांपर्यंत खाली आले, तर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.48 लाख रुपयांच्या आसपास नोंदवण्यात आला.

सोमवारी (2 फेब्रुवारी) सकाळच्या सत्रात स्पॉट गोल्डमध्ये सुमारे 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली, तर चांदीच्या दरातही मोठी घट दिसून आली. विशेष म्हणजे मागील सत्रात चांदीने गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी इंट्राडे घसरण नोंदवली होती, ज्यामुळे बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांच्या नियुक्तीची घोषणा केल्यानंतर डॉलर मजबूत झाला आहे. डॉलर वधारल्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला असून, जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे. भारतात सोमवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,48,240 रुपये तर चांदीचा दर 2,66,500 रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला.

मुंबईसह प्रमुख शहरांतील सोन्याचे आजचे दर (प्रति 10 ग्रॅम)

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,47,970 रुपये आहे. दिल्लीत 1,47,720 रुपये, कोलकात्यात 1,47,780 रुपये तर बंगळुरूमध्ये 1,48,090 रुपये दराने सोने विकले जात आहे. दक्षिण भारतात सोन्याचे दर तुलनेने जास्त असून चेन्नईमध्ये 1,48,400 रुपये आणि हैदराबादमध्ये 1,48,210 रुपये प्रति 10 ग्रॅम दर आहे.

चांदीचे आजचे दर (प्रति किलो)

मुंबईत चांदीचा भाव 2,66,020 रुपये असून दिल्लीत 2,65,560 रुपये आहे. चेन्नईमध्ये चांदी सर्वाधिक म्हणजे 2,66,790 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. हैदराबादमध्ये 2,66,440 रुपये, बंगळुरूमध्ये 2,66,230 रुपये आणि कोलकात्यात 2,65,660 रुपये प्रति किलो असा दर आहे. सध्या सुरू असलेल्या चढ-उतारामुळे सर्वसामान्य ग्राहकांसह गुंतवणूकदारांचेही लक्ष जागतिक घडामोडी आणि डॉलरच्या हालचालींकडे लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!