Mumbai Weather Forecast: दिवसभर आर्द्रतेचा त्रास सहन केल्यानंतर मुंबईकरांना येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्यासाठी यलो अलर्ट तर पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. शहर आणि उपनगरात पुढील 48 तासांत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या सरींची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान 31°C तर किमान तापमान 25°C च्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागानुसार, वायव्य आणि मध्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत दक्षिण ओडिशा आणि छत्तीसगडकडे सरकणार आहे. या हवामान प्रणालीच्या परिणामामुळे 13 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात, तर 14 आणि 15 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात व्यापक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Mumbai
•Sept 14–15: Patchy light–moderate showers; sunny breaks possible.
•Sept 16: Showers intensify late evening/night (some heavy bursts).
•Sept 17–18 (peak): Widespread moderate–heavy rain (≈50–80 mm/day) with thunderstorms, lightning, gusty winds → risk of urban…— MumbaiWeatherLab (@Akshay_Sunil_) September 11, 2025
आतापर्यंत मुंबईत वार्षिक सरासरी पावसाच्या 95 टक्के पाऊस झाला असून पूर्व उपनगरात 2269.65 मिमी, पश्चिम उपनगरात 2239.95 मिमी आणि शहर भागात 1767.62 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


