Today शुक्रवार, 28th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BJP-Congress Alliance: अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप-काँग्रेसची हातमिळवणी; शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी नवा फॉर्म्युला

BJP-Congress Alliance: अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप-काँग्रेसची हातमिळवणी; शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी नवा फॉर्म्युला

BJP-Congress Alliance: राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा अंबरनाथ नगरपरिषदेच्या निमित्ताने आला आहे. ज्या काँग्रेसला संपवण्याची घोषणा भाजपने केली होती, त्याच काँग्रेसच्या मदतीने भाजपने अंबरनाथमध्ये आपली सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आपल्याच मित्रपक्षाला (शिवसेना शिंदे गट) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने हा धक्कादायक पवित्रा घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

असे जुळले सत्तेचे गणित

अंबरनाथ नगरपरिषदेच्या ५९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र, आता भाजपने नवी मोट बांधली आहे:
भाजप: १६ जागा
काँग्रेस: १२ जागा
राष्ट्रवादी (अजित पवार गट): ४ जागा
एकूण बळ: ३२ नगरसेवक (बहुमताचा आकडा पार)

भाजपच्या तेजश्री करंजुले या आधीच नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत, आता या नव्या आघाडीमुळे त्यांना सभागृहातही स्पष्ट बहुमत मिळणार आहे. सर्वात जास्त म्हणजेच २३ जागा निवडून आणूनही शिवसेना शिंदे गट सत्तेपासून दूर फेकला गेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काँग्रेसमुक्त भारताच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेचा घात केला आहे, ही अभद्र युती आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

शिंदे गटाच्या टीकेला भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या २५ वर्षांपासून अंबरनाथमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांसोबत जाणे ही खरी ‘अभद्र युती’ ठरली असती. आम्ही युतीसाठी चर्चेचा प्रयत्न केला, पण शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा पलटवार त्यांनी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!