Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dadar Kabutarkhana : डॉक्टर मूर्ख, एक-दोन जण मेल्यानं काय होतं?; जैन धर्मसभेत कैवल्य रत्न महाराज बरळले

Dadar Kabutarkhana : डॉक्टर मूर्ख, एक-दोन जण मेल्यानं काय होतं?; जैन धर्मसभेत कैवल्य रत्न महाराज बरळले

मुंबई : दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या विवादाने मुंबईत धुमाकूळ घातला असून, आज (११ ऑक्टोबर) जैन समुदायाकडून कबूतरांच्या आत्मशांतीसाठी विशेष धर्मसभा भरविण्यात आली. या सभेत जैन मुनि कैवल्य रत्न महाराज यांनी डॉक्टरांना “मूर्ख” संबोधत भडकले, तर सुरेशजी महाराज आणि स्वरूपानंदजी महाराज यांनी कबूतरांना राष्ट्रीय प्राणी जाहीर करण्याची मागणी केली.

विवादात काही कबुतरांचा मृत्यू झाल्याने ही सभा आयोजित करण्यात आली असून, जैन नेत्यांनी सरकारला आगामी निवडणुकांमध्ये किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला. हा विवाद आता आरोग्य, धर्म आणि राजकारण यांच्यात अडकला असून, बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानुसार बीएमसीने कबुतरखान्यांवर कारवाई केली आहे.

कैवल्य रत्न महाराजांचा रोष

धर्मसभेत कैवल्य रत्न महाराज यांनी कबूतरांना “शांतता प्रिय प्राणी” संबोधत म्हटले, “आमचा धर्म सांगतो, दुसऱ्यासाठी मरायचं असेल तरी चालेल. रावणासमोर जटायू पक्षी समोर आला होता. त्यामुळे पक्षी किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हापासूनच लोकांना माहिती आहे. एका पक्षासाठी श्रीराम यांनी एवढं केलं. तर या रामाच्या भूमीमध्ये असं व्हायला नको आहे.” त्यांनी डॉक्टरांना उद्देशून, “मी डॉक्टरांना पण मूर्ख मानतो. एक-दोन जण मेल्यानं काय होतं? दररोज सामान्य माणूस मरतो, त्याचा सरकार विचार करत नाही,” असे विधान केले.

कबुतरखान्यावरून राजकारण सुरू असल्याचा आरोप करत ते म्हणाले, “मंत्री मंगलप्रभात लोढा आज धर्मसभेत आले नाही, ही सरकारची मिलीभगत आहे.” लोढा यांनी नुकतेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जैन मंदिराजवळ नवीन कबुतरखाना उद्घाटित केला असला तरी, दादर विवादात ते सहभागी झाले नाहीत.

धर्मसभेत सुरेशजी महाराज यांनी कबूतरांच्या संरक्षणावर भर देऊन म्हटले, “कबूतर हा प्राणी आहे. त्याची हत्या झाली म्हणजे शंकराची हत्या झाल्यासारखं आहे. सर्व सनातनी धर्म तुमच्यासोबत आहे. कबूतर आणि गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा, ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे.” त्यांनी हा मुद्दा धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

स्वरूपानंदजी महाराजांचा इशारा

स्वरूपानंदजी महाराज यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत म्हटले, “आमच्यामध्ये एक मानलं जातं ते आमच्या प्राण्यांवर जर हल्ला झाल्यास त्याला उत्तर देतो. मग त्यामध्ये त्यांना वाचवण्यासाठी शस्त्र उचलले तरी चालतील. जे सत्तेत बसलेत त्यांना साधूसंतांनी बसवले. आम्ही घरोघरी पोहोचलो आणि प्रचार केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. आम्ही साधूसंत रस्त्यावर उतरू.” हा इशारा जैन आणि सनातनी समुदायांच्या एकजुटीचा दाखला देतो.

जैन नेत्यांचा सरकारला इशारा

सभेत जैन धर्मीयांनी स्पष्ट केले, “कबूतरांमुळे आजार होतो आतापर्यंत असं कधीही पुरावा आलेला नाही. प्राण्यांवरती महापालिका आयुक्त अन्याय करत आहेत. एवढ्या वर्षांपासून कबूतर खाणे असतानाही यावरती कधी प्रश्न निर्माण झाला नाही आणि आताच प्रश्न निर्माण होतोय याचा अर्थ आजूबाजूला कोणाला डेव्हलपमेंट करायची आहे त्यामुळे हा मुद्दा समोर येतोय. नवीन ठिकाणी कबूतर खाणा हलविण्यासाठी हा काही एसआरए प्रोजेक्ट आहे का? याची किंमत आगामी निवडणुकांमध्ये सरकारला मोजावी लागेल.” ते म्हणाले की, बीएमसीची कारवाई राजकीय षड्यंत्राचा भाग असून, कोर्टाच्या आदेशानंतरही धार्मिक भावनांचा आदर करावा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!