Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणीसाठी आणखी एक नियम, ‘हे’ करा अन्यथा कडक कारवाई

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणीसाठी आणखी एक नियम, ‘हे’ करा अन्यथा कडक कारवाई

Ladki Bahin Yojana new rules : महायुती सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा फायदा झाला असला, तरी या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडत आहे. यामुळे बोगस लाभार्थ्यांना शोधून काढण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे.

योजनेतील निकषांची कठोर अंमलबजावणी करत लाखो अपात्र लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. आता सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. योजनेतील महिला लाभार्थ्यांसोबतच त्यांच्या पती किंवा वडिलांचे ई-केवायसी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन नियमांनुसार, लाभार्थी महिलेच्या वार्षिक उत्पन्नासोबतच तिच्या पतीचे (विवाहित असल्यास) किंवा वडिलांचे (अविवाहित असल्यास) उत्पन्न तपासले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जर पती किंवा वडिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल, तर संबंधित महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल.

यापूर्वी फक्त महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात होती, ज्यामध्ये बहुतांश गृहिणी आणि इतर महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचे आढळले होते. मात्र, आता कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाची तपासणी करण्यासाठी पती किंवा वडिलांचे ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे.

या नव्या नियमामुळे लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यात यश मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. यामुळे योजनेचा आर्थिक भार कमी होऊन केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अशी करा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण ?

  • मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
  • आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करा.
  • आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करा.
  • यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
  • जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
  • जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
  • जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
  • यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करा.

जात प्रवर्ग निवडावा आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:

1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!