Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात 34 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; नाशिक पोलिस परिक्षेत्रात मोठा प्रशासकीय फेरबदल

राज्यात 34 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; नाशिक पोलिस परिक्षेत्रात मोठा प्रशासकीय फेरबदल

IPS Officer Transferred : राज्यात पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून तब्बल ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेषतः नाशिक पोलिस परिक्षेत्रात अवघ्या काही दिवसांत झालेल्या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक (IG) पदावर आता संजय येनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईतील व्हीआयपी सुरक्षा विभागात कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीमुळे नाशिक परिक्षेत्राला नवे नेतृत्व मिळणार आहे.

दरम्यान, प्रवीण पडवळ यांची अवघ्या पाच दिवसांतच बदली करण्यात आली आहे. दत्तात्रय कराळे यांच्या बदलीनंतर नुकतीच त्यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता त्यांची मुंबईतील दादर येथील व्हीआयपी सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी नाशिक परिक्षेत्राचे IG असलेले दत्तात्रय कराळे यांची आधीच बदली करण्यात आली होती.

नाशिक एसपी कार्यालयातही बदल

नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी विमला एम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी अहिल्यानगर येथील राज्य राखीव बल गटात समादेशक म्हणून कार्यरत होत्या.

महत्त्वाच्या बदल्यांची यादी

संजय येनपुरे – विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र
प्रवीण पडवळ – व्हीआयपी सुरक्षा विभाग, दादर (मुंबई)
आदित्य मिरखेलकर- बदली
विमला एम – अपर पोलिस अधीक्षक, नाशिक

अवघ्या पाच दिवसांत झालेल्या या बदल्यांमुळे नाशिक पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून या निर्णयामागील कारणांबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!