मुंबई : उत्तर भारतातून येणाऱ्या हिमालयीन थंड हवामानाच्या लाटेने महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आजपासून राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा (Cold Wave) इशारा जारी केला असून, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्री-पहाटे हाडे गोठवणारी थंडी जाणवत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे, तर नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे तापमान इतके खाली आले की दवबिंदू (Dew Point) गोठल्याची नोंद झाली.
थंडीच्या तीव्र लाटेचा यलो अलर्ट असलेले प्रमुख जिल्हे
धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा आणि अकोला या १४ जिल्ह्यांत पुढील ४८ ते ७२ तास कडाक्याची थंडी कायम राहणार आहे.
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान
अहिल्यानगर: ८.४
नाशिक: ९.२
यवतमाळ: ९.६
जळगाव: ७.१
मालेगाव: ९.६
गोंदिया: ९.६
पुणे: ९.४
नागपूर: १०.४
अमरावती: ११.४
महाबळेश्वर: १०
सातारा: १०.६
सांगली: १२.३
सोलापूर: १३.९
परभणी : ७
हवामान खात्याचा अंदाज
पुढील ३-४ दिवस उत्तर महाराष्ट्र, मराठवडा आणि विदर्भात किमान तापमानात आणखी १-२ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. रात्री व पहाटे दाट धुके आणि दंव पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही (पुणे, सातारा, सांगली) थंडीचा जोर कायम राहील.


